CoronaVirus: नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट; पाडव्याच्या खरेदीकडे नागरिकांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 07:46 PM2020-03-24T19:46:09+5:302020-03-24T20:02:14+5:30

१४४ कलम लागू केल्याने भाजी विक्रेते तुरळक प्रमाणात दिसत आहेत. त्यामुळे भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होत आहे.

उद्या मराठी नववर्ष सुरू होत आहे. मात्र, नागरिकांच्या उत्साहावर कोरोनाने विरजण घातले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजीपाला, दूध आदी ठिकठिकाणी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले आहे.

दुसरीकडे उलट चित्र दिसत आहे. पनवेलमध्ये भाजीमार्केटमध्ये तोबा गर्दी उसळत आहे.

पाडव्याच्या खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरविली आहे. कारण दुकानेच बंद आहेत.

गुढी पाडवा साजरा करण्यासाठी बाजारात काही गाड्यांवर साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे.

मात्र, लोकांनी तिकडे न जाण्याची भूमिका घेतली आहे. यामुळे दरवर्षी गर्दी होणाऱ्या गाड्यांवर तुरळक ग्राहक दिसत आहेत.

पाडवा साजरा करण्यासाठी ऊस, फुलं, आंब्याची पाने, कडुनिंबाचा पाला, साखरेच्या गाठी असे साहित्य लागते.

मात्र, यंदा मागणीच नसल्याने शेतकऱ्यांसह इतरांचे नुकसान झाले आहे.

मुंबईतील दादर फुलमार्केटही बंद आहे. यामुळे उद्या पाडवा साजरा करण्यासाठी फुलांची टंचाई जाणवणार आहे.

मुंबईत नेहमीच्या वर्दळीच्या रेल्वेस्थानकांवर देखील चिटपाखरू नाहीय.