CoronaVirus: Take special care when handling notes; Action if the rules are not followed rkp
CoronaVirus : नोटा हाताळताना विशेष काळजी घ्या; नियमांचे पालन न केल्यास कारवाई By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 08:29 PM2020-04-18T20:29:28+5:302020-04-18T20:43:15+5:30Join usJoin usNext मुंबई : मुंबईसह राज्यभरात कोरोनाला अटकाव करण्यासाठी टाळेबंद असली तरीही जीवनावश्यक सेवा सुरु आहे. त्यामुळे बँक किंवा दुकानात नोटा हाताळताना विशेष काळजी घेण्याचे निर्देश राज्याच्या अन्न व औषध प्रशासानाने दिले आहेत. त्यात महत्त्वाचे म्हणजे, बँक कर्मचाऱ्यांनी व दुकानदारांनी नोटा हाताळल्यानंतर हात सॅनिटायझरने स्वच्छ धुवून घ्यावेत आणि अन्न व्यावसायिकांनी अन्नपदार्थ हाताळण्यापूर्वी व अन्न पदार्थ हाताळल्यानंतर हॅण्ड सॅनिटायझरचा वापर करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. या सूचनांचे पालक न केल्यास अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. खाद्यपदार्थांची विक्री व उत्पादन करणाऱ्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, दुकानांच्या बाहेर रांगेत उभे राहाणाऱ्या ग्राहकांमध्ये एक मीटरचे अंतर राखावे. अन्नपदार्थ हाताळल्यानंतर त्या हातांनी चेहऱ्याला स्पर्श करू नये. दुकाने-आस्थापनांमध्ये स्वच्छता राखा. मास्कचा वापर अनिवार्य आहे, ग्राहकांसाठी हॅण्डसॅनिटायझरची व्यवस्था करा अशा सूचनांचा समावेश आहे. याखेरीज, अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी करावी. वैयक्तिक स्वच्छता राखा. लॉकडाऊनच्या काळात अन्न व्यावसायिकांनी चांगल्या दर्जाच्या अन्नपदार्थांची विक्री करावी. मुदतबाह्य अन्नपदार्थांची विक्री करू नका. नाशवंत अन्नपदार्थ फ्रीजमध्ये योग्य तापमानात साठवावे. त्याचे सेवन चोवीस तासांच्या आत करण्याबाबत ग्राहकांना सूचना द्याव्यात. या कालावधीत फक्त परवानाधारक-नोंदणीकृत अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थांची खरेदी करावी. पक्की बिले घेऊन त्याची बिले जतन करून ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronavirus in Maharashtra