'Dagdhishhishak' - Viral photographs of milk agitation ...
'दुग्धाभिषेक' - दुध आंदोलनाची व्हायरल छायाचित्रे... By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 04:20 PM2018-07-17T16:20:44+5:302018-07-17T16:38:39+5:30Join usJoin usNext राज्यभरात दूध आंदोलन चांगलेच पेटले आहे. खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे शेतकरी या आंदोलनात सहभागी होत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या पुकारलेल्या आंदोलनात मंगळवारी दुसऱ्या दिवशीही कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतक-यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. तर दुध पिशव्याही रस्त्यावर फेकून देण्यात आल्या आहेत. दुध आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यानी कुठे रस्त्यावर दुध फेकून तर कुठे मंदिरात देवाला दुग्धाभिषेक करुन सरकारचा निषेध नोंदवला. गायीचे दुधही आईच्या दुधाइतकेच पवित्र मानून अनेक आंदोलकांनी दुध रस्त्यावर फेकून देण्याऐवजी शाळेतील मुलांना मोफत वाटून सरकारचा निषेध नोंदवला. गावाकडील तरुण मित्रांनाही या दुध आंदोलनात सहभाग घेतला. पण, दुधाची किंमत जाणून घेऊन दुध रस्त्यावर न फेकता गावातीलच गरजूंना वाटप केलं. आंदोलनात सहभागी झालेल्या अनेकांनी सरकारविरुद्ध रोष व्यक्त करत चक्क रस्त्यावरच दुध फेकून दिले. आंदोलनातील काही तरुण कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळावर दुग्धाभिषेक करुन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. गावाकडील तरुणांनी डेअरीला घालण्यात येणार दुध अडवून चक्क रस्त्यावर दुध फेकत सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवला. गरुजुंना दुधवापट करुनही काही आंदोलकांनी शांतबद्ध पद्धतीने निषेध नोंदवला. सरकारने लिटरमागे 5 रुपये दर वाढवून द्यावा, यासाठी खासदार राजू शेट्टींच्या नेतृत्वात हे आंदोलन पुकारले आहे. धरणीमातेला जणू दुग्धाभिषेक घालतात की काय हे आंदोलनकर्ते, असेच या छायाचित्रातून दिसत आहे. गेल्या 2 दिवसांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाची धार आज अधिकच तीव्र पाहायला मिळाली.टॅग्स :दूधदूध पुरवठाराजू शेट्टीआंदोलनmilkMilk SupplyRaju Shettyagitation