दीपिका पादुकोणनं घेतला राजस्थानी थाळीचा आस्वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2018 15:51 IST2018-01-29T15:12:26+5:302018-01-29T15:51:34+5:30

प्रचंड विरोधानंतरही अखेर संजय लीला भन्साळी यांचा ‘पद्मावत’ देशभरात बॉक्सऑफिसवर रिलीज झाला आहे. चारच दिवसांत सिनेमानं कमाईचा उच्चांक गाठल्याने, सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली दीपिका पादुकोण चांगलीच हरकून गेली आहे.
सिनेमाला मिळालेलं यश तिनं राजस्थानी थाळीचा आस्वाद घेत सेलिब्रेट केलं.
रविवारी (28 जानेवारी) रात्री दीपिका जुहूमधील एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. येथे तिनं राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला.
हिरव्या रंगाचा शरारा व लाँग कुर्तामध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत होती.
दीपिकाचा हा आउटफिट सब्यसाची मुखर्जीने डिझाइन केला आहे.
राजस्थानी थाळीचा स्वाद घेताना दीपिका खूपच खूश दिसत होती. यावेळी तिने चाहत्यांसोबत सेल्फीही घेतला.