Devendra Fadanvis: मुख्यमंत्री म्हणत राणेंची फडणवीसांना 'जादू की झप्पी', पण भाजपचा 'दे धक्का' By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 04:28 PM 2022-06-30T16:28:09+5:30 2022-06-30T16:47:33+5:30
भाजप नेते आणि सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करणाऱ्या निलेश राणे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांना शुभेच्छाही दिल्या. गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय सत्तानाट्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. गोव्याहून सकाळी चार्टर्ड प्लेनने शिंदे मुंबई विमानतळावर दाखल झाले.
यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपाचे काही नेते पोहचले होते. विमानतळावर भाजपा कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर त्यांना झेड दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे मुंबईत दाखल होताच थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहचले. याठिकाणी देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यात नव्या सरकारचा तातडीने शपथविधी करून घ्यावा असा संदेश दिल्लीहून आला. त्यामुळे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार आहे.
शपथविधी सोहळ्यानंतर विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा विचार समोर येत असल्याची माहिती आहे.
भाजप नेत्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा असून भाजपचे सर्वच दिग्गज नेते मुंबईत दाखल झाले आहेत. भाजप आमदारांसह अपक्ष आमदारसही मुंबईतच पोहोचले आहेत.
भाजप नेते आणि सातत्याने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टिका करणाऱ्या निलेश राणे यांनीही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी फडणवीस यांना शुभेच्छाही दिल्या.
विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली व त्यांना पुढील भावी मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या, असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यामुळे, सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.