Devendra Fadanvis: होय, हा महाराष्ट्र; समृद्धी महामार्गाचे फोटो शेअर करत फडणवीसांनी विचारला प्रश्न By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 08:59 AM 2022-12-11T08:59:52+5:30 2022-12-11T09:16:43+5:30
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याल्या अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे. या सोहळ्याल्या अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे.
नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून तसेच समृद्धी महामार्गावरून प्रवास करणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धीमहामार्ग लोकार्पण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य सरकारने उभारलेला देशातील सर्वाधिक लांबीचा वेगवान असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा ठरणार असून राज्याच्या सर्वांगिण विकासात हा महामार्ग ‘गेमचेंजर’ ठरणार असल्याचे एकनाथ शिंदेंनी सांगितले.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या संकल्पनेतून हा महामार्ग पुढे आला त्या देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हा आहे, त्यामुळे, या पहिल्या टप्प्याच्या उद्घटनाचे फडणवीसांनाही विशेष कौतुक आहे.
देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाचे फोटो ट्विटरवरुन शेअर करत आनंद व्यक्त केला आहे. तसेच, या महामार्गाची काही वैशिष्टेही सांगितली आहे. रात्रीच्या अंधारात वीजेच्या दिव्यांनी प्रकाशमान झालेला समृद्धी महामार्गातील चौक नेत्रदीपक दिसून येते.
नागपूरच्या हिंगनाजवळील हा १८ एकर परिसरात पसरलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि भारतातील दुसऱ्या क्रमांचा मोठा चौक आहे. विशेष म्हणजे येथील नेत्रदीपक रोषणाई ही सोलर ऊर्जातून निर्माण होत आहे, त्यामुळेही हा पर्यटनाचा एक महत्त्वाचा भाग असणार आहे.
फडणवीसांनी या फोटोसह अनेक फोटो शेअर केले असून नेटीझन्सला एक प्रश्नही विचारला आहे. फडणवीसांनी शेअर केलेल्या ४ फोटोत कोणतं एक साम्य आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यावर, अनेकांनी कमेंट करुन उत्तर दिलंय.
या फोटोत सगळीकडे निसर्गरम्य ग्रीनरी म्हणजे झाडी, डोंगर दिसत असून समृद्धी महामार्गाचा लांब सिमेंट पट्टा दिसून येत आहे. मात्र, या चारही फोटोतील एक कॉमन गोष्ट आहे, ती म्हणजे वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी स्वतंत्र पूल, अंडरब्रीज आणि ओव्हरब्रीज दिसून येतात.
होय, हाच भारत.. होय हाच महाराष्ट्रसुद्धा, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी समृद्धी महामार्गाचे विलोभनीय दृश्य दाखवणारे छायाचित्र सर्वांसाठी सोशल मीडियातून शेअर केले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा प्रकल्प चॅलेंजींग होता, मात्र आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी या कामाच्या परवानग्यांना गती दिली अन् आता समृद्धी महामार्ग लोकांसाठी खुला होत आहे