डान्सिंग अंकलचं स्वप्न झालं पूर्ण, गोविंदासोबत लावले ठुमके
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 16:07 IST2018-06-15T16:07:34+5:302018-06-15T16:07:34+5:30

सोशल मीडियावर अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेले डान्सिंग अंकल संजीव श्रीवास्तव यांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. संजीव श्रीवास्तव यांनी बॉलिवूड अभिनेता गोविंदासोबत डान्स करण्याची संधी मिळाली.
माधुरी दीक्षितचा डान्सिंग शो 'डान्स दिवाने'च्या सेटवर गोंविदा आणि डान्सिंग अंकलची भेट झाली.
संजीव श्रीवास्तव यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांची गोविंदासोबत तुलना होऊ लागली होती
गोविंदाच्या 'खुदगर्द' सिनेमातील 'आपके आ जाने से' गाण्यावर संजीव श्रीवास्तवनं डान्स केला. माधुरी दीक्षित आणि गोविंदानंही यावेळी डान्स केला.
गोविंदाला पाहताच संजीव श्रीवास्तव यांनी त्यांच्या पायांना स्पर्श केला.