वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने केला लोकलच्या वेळापत्रकात बदल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 17:21 IST2017-12-15T17:17:22+5:302017-12-15T17:21:39+5:30

वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
18 डिसेंबरपासून कसारा आणि कर्जत स्थानकातून सुटणा-या लोकल फे-यांचे वेळा बदलण्यात येणार आहे.
कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकल वेळापत्रकाप्रमाणे धावणार आहेत. यात कोणताही बदल करण्यात येणार नाही.
मध्य रेल्वेने 18 डिसेंबरपासून या गाड्या 10 ते 15 मिनिटं आधी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.