मेट्रोच्या भुयारी कामामुळे ऐतिहासिक इमारतींना धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 06:18 PM2017-09-15T18:18:01+5:302017-09-15T18:22:49+5:30

मुंबईतल्या ऐतिहासिक वारसा असलेल्या जे. एन. पेटिट इन्स्टिट्युट या इमारतीला मेट्रोच्या भुयाराच्या कामामुळे धोका.

जे. एन. पेटिट ही इमारत 119 वर्षे जुनी असून या भागात अनेक हेरिटेज इमारती आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने या भुयाराच्या कामाला दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर आणि न्यायाधीश एन. एम. जामदार यांच्या खंडपीठानं एक समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे.

मेट्रोच्या भुयारी कामाचा इमारतींवर काय परिणाम होईल याचा अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे.