Durga Puja is celebrated in these four cities
'या' चार शहरांमध्ये साजरी केली जाते दुर्गा पूजा By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:32 PM2018-10-16T13:32:57+5:302018-10-16T14:59:13+5:30Join usJoin usNext कोलकातामधील दुर्गा पूजा फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. कोलकातामध्ये नवरात्राच्या सातव्या दिवसापासून ते विजयादशमीपर्यंत दुर्गादेवीची आराधना याठिकाणी केली जाते. मात्र, कोलकाताशिवाय वाराणसी, आसाम, म्हैसूर आणि मुंबईतही दुर्गा पूजेचा उत्सव आनंदाने साजरा केला जातो. वाराणसीमध्ये प्रत्येक सण साजरा केला जातो. याठिकाणी दुर्गा पूजा, दसरा, दिवाळी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते. आसाममधील गुवाहाटीमध्ये दुर्गा देवीची पूजा करण्यात येते. याठिकाणी गरबा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. कोलकातात बंगाली लोक ज्याप्रमाणे दुर्गा पूजा करतात, त्याप्रमाणेच म्हैसूरमधील लोक नवरात्रीत पूजा करताना दिसतात. दुर्गा पूजेसाठी म्हैसूर प्रसिद्ध आहे. याशिवाय येथे दसरा सुद्धा मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतो. मुंबईत ठिकठिकाणी दुर्गा पूजेसाठी मंडप उभारले जातात. तसेच, याठिकाणी गरबा आणि दांडियाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले येते. टॅग्स :नवरात्रीदांडियाNavratriDandia