Early next year, devotional messages to 'king'
Ganesh Visarjan 2018: पुढच्या वर्षी लवकर या, 'राजा'ला भक्तिमय निरोप By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 02:48 PM2018-09-24T14:48:08+5:302018-09-24T15:03:01+5:30Join usJoin usNext मुंबईतील गिरगावच्या चौपाटीवर आज लाडक्या लालबागच्या राजाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. लालबागच्या राजासह अश्वारुढ मुंबईच्या राजाचेही गिरगाव चौपाटीवर मोठ्या गर्दीत अन् पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात विसर्जन करण्यात आले वरळीच्या राजालाही वरळी सी लिंक येथील समुद्रात भाव अन् भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला मुंबईतील गिरगावच्या चौपाटीवर लालबागच्या राजासह मुंबईतील इतरही मंडळातील राजांचे विसर्जन करण्यात आले, यावेळी भक्तांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मच्छिमारही आपल्या नावा घेऊन गिरगावच्या समुद्रात तैनात होते, 10 दिवसाच्या उत्सवानंतर आज वातावरण भावून बनलं होतं बाप्पांच्या विसर्जनाचा सोहळा, याची देही याची डोळा साठवावा असाच होता. त्यामुळेच माध्यमांचे कॅमेरेही या समुद्रतटावर गर्दी करुन होते सर्वांच्या मनी होती एकच आस, पुढच्या वर्षी लवकर या...टॅग्स :लालबागचा राजागणेशोत्सवगणेश विसर्जनLalbaugcha RajaGanpati FestivalGanesh Visarjan