Earth Hour: 'Bati Gool' for Hours!
Earth Hour : तासाभरासाठी 'बत्ती गूल' ! By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2018 06:59 AM2018-03-25T06:59:23+5:302018-03-25T07:10:05+5:30Join usJoin usNext मुंबई : मुंबई, दिल्लीसह जगभरातील अनेक शहरांमध्ये बत्ती गूल करून 'अर्थ अवर' पाळण्यात आला. शनिवारी (24 मार्च) 8.30 वाजता जगभरातील अनेक कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणांवरील दिवे तासाभरासाठी बंद करण्यात आले होते. जगभर पृथ्वीच्या पर्यावरण रक्षणाविषयी जागरुकता आणण्यासाठी तासभर दिवे बंद करण्याची सुरुवात झाली. अर्थ अवरची सुरुवात वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरने केली. जगात पहिल्यांदा 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरात अर्थ अवर साजरा झाला. नागरिकांना आवाहन करून तासभरासाठी दिवे बंद केले गेले. हळूहळू जागरणाची ही लाट जगभर पसरली. गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही अर्थ अवरसाठी अंधार केला जाऊ लागला आहे. मुंबईसह दिल्ली, कोलकाता या शहरातील प्रमुख इमारतींचे दिवे बंद करण्यात आले होते. यावेळी दिवे बंद करण्यात आलेली आणि चालू असलेली ही छायाचित्रे आहेत. जगातील 178 देशांमध्ये दरवर्षी ही मोहीम राबवली जाते. तसेच, या मोहिमेत जास्तीत जास्त नागरिकांना सहभाग घ्यावा, यासाठी वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचरकडून आवाहन करण्यात येतेटॅग्स :मुंबईपृथ्वीभारनियमनMumbaiEarthPower Shutdown