A few moments of welcome to Miss World Hariyanvi Chori Manushi Chillar ...
मिस वर्ल्ड हरियाणवी छोरी मानुषी छिल्लरच्या स्वागताचे काही क्षण... By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2017 10:38 PM2017-11-26T22:38:14+5:302017-11-26T22:40:49+5:30Join usJoin usNext तब्बल 17 वर्षानंतर भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून देणाऱ्या मानुषी छिल्लरचं शनिवारी रात्री भारतात आगमन झालं. विमानतळावर तिचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मानुषीनेही हात उंचावत हसतमुखाने सर्वांच्या अभिवादनाचा स्वीकार केला भारताला मिस वर्ल्डचा किताब मिळवून दिल्यानंतर मानुषी सिंगापूरला गेली होती. चीनमधल्या पार पडलेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेत जवळपास 17 वर्षांनंतर मानुषीनं मिस वर्ल्डचा किताब पटकावून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सिंगापूरमधला कार्यक्रम संपल्यानंतर ती मध्यरात्रीच्या सुमारास भारतात दाखल झाली. विमानतळावर मिस वर्ल्ड ऑर्गनायजेशन ज्युलिया मोर्ले यादेखील मानुषीसोबत होत्या. मिस वर्ल्डचा मुकुट परिधान केलेली आणि हातात पुष्पगुच्छ धरलेली मानुषी खुपच सुंदर दिसत होती. मानुषीची एक झलक पाहण्यासाठी विमानतळावर हजारोच्या संख्येने लोकं उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने तिचं स्वागत झालं. मानुषीला कॅमे-यात टिपण्यासाठी विमानतळावर अनेकांची अक्षरशः झुंबड उडाली. मानुषीनेसुद्धा हात वर करत स्मितहास्यानं सर्वांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला आहे. याप्रसंगी मीडियाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं विमानतळावर उपस्थित होते.