अंधेरीमध्ये फरसाण दुकानातील अग्नितांडवात 12 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 11:01 IST2017-12-18T10:57:23+5:302017-12-18T11:01:35+5:30

मुंबईतील अंधेरी पूर्व येथे साकीनाका परिसरात खैरानी रोडवरील भानु फरसाणच्या दुकानामध्ये सोमवारी (18 डिसेंबर) पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.
या अग्नितांडवात 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
खैरानी रोडवरील लक्ष्मी नारायण मंदिराजवळील भानु फरसाणच्या दुकानाला ही आग लागली होती.
आग लागल्यानंतर दुकानाचे छप्पर कोसळून 10 ते 15 जण त्याखाली अडकले होते.