मुंबई : लोअर परळमध्ये पुन्हा अग्नितांडव ! नवरंग स्टुडिओ जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 15:51 IST2018-01-19T15:43:04+5:302018-01-19T15:51:14+5:30

लोअर परळ येथील तोडी मिलमध्ये असलेल्या नवरंग स्टुडिओला (19 जानेवारी) मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली.

या अग्नितांडवात स्टुडिओचा चौथा मजला जळून खाक झाला आहे.

हा स्टुडिओ अनेक वर्षापासून बंद असल्याने सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मात्र आग विझवताना अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे.

आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या