मुंबई : कमला मिल कम्पाऊंडमधील अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 10:06 IST2017-12-29T10:01:31+5:302017-12-29T10:06:59+5:30

मुंबईतील लोअर परळ परिसरातील कमला मिल कम्पाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टोल'ला ही भीषण आग लागली. या अग्नितांडवात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.
जीव वाचवण्यासाठी सर्वांना स्वत:ला एका ठिकाणी कोंडून घेतल्याने नाका, तोंडात धुर जाऊन गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती केईएम हॉस्पिटलचे डॉ. राजेश डेरे यांनी माहिती दिली आहे.
मृतांमध्ये 11 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे
अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं
आगीच्या दुर्घटनेमुळे कमला मिल कम्पाऊंडमधील वीजपुरवठा तातडीनं खंडित करण्यात आला होता
दुर्घटनेप्रकरणी पब व रेस्टॉरन्टच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.