Mulund Raja 2019: मुलूंडचा राजा ! गणपती माझा नाचत आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 08:07 PM2019-08-26T20:07:29+5:302019-08-26T20:14:12+5:30

गणपती बाप्पाचे आगमन केवळ 8 दिवसांवर आले आहे, मुंबईतील गणेश मंडळाकडून बाप्पांच्या मूर्तीचे आगमन होत आहे

गवानपाडा येथील मुलूंडच्या राजाचे मोठ्या थाटा-माटात आगमन झाले, गणेशभक्तांनी सवाद्य मिरवणूक काढून गणरायाचे स्वागत केले

ताशांचा आवाज तराररा... झाला अन् गणपती माझा नाचत आला....

गणपतीचे गणेश मंडळात आगमन होताच, विद्युत रोषणाईने मंडळ परिसर लखलखीत झाला होता

गणेश भक्तांचा लेझीम डान्स, गणपतीच्या गाण्यांची वाद्य मिरवणूक अन् भक्तांचा उत्साह म्हणजे गणपती बाप्पा मोरया...

प्रथम तुला वंदितो.... असे म्हणत पुढील 15 दिवस गणेशोत्सवाची धूम मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे