Ganesh Chaturthi 2019: Ganesh devotees shopping at lalbaug in mumbai
Ganesh Chaturthi 2019 : गणेशभक्तांचा उत्साह शिगेला; लगबग खरेदीची... By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 01:30 PM2019-08-28T13:30:28+5:302019-08-28T13:35:55+5:30Join usJoin usNext गणेशोत्सव अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे खरेदीसाठी चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. दादर, लालबागसह मुंबईतील सर्व लहान-मोठ्या मार्केटला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रंगरंगोटीचे सामान, गणेश अलंकार, तोरणे, रांगोळ्या, मखर, रंगीबेरंगी पडदे, विद्युत रोषणाईचे सामान, गौरीच्या मूर्ती, धूप-कापूर, सुवासिक अगरबत्ती, विविध प्रकारचे मोदक; त्याचप्रमाणे भजनासाठी लागणारे टाळ, मृदंग आणि ढोलकी खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. गणेशभक्तांचा हा खरेदीचा उत्साह छायाचित्रित केला आहे, ‘लोकमत’चे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांनी...टॅग्स :गणेश महोत्सवगणेशोत्सव विधीखरेदीGanesh MahotsavGanesh Festival RitualsShopping