गणेशोत्सव : सोशल डिस्टंसिंगला हरताळ, चतुर्थीच्या खरेदीसाठी मुंबई, ठाण्यात प्रचंड गर्दी By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 06:40 PM 2020-08-21T18:40:50+5:30 2020-08-21T19:03:12+5:30
उद्या असलेल्या गणेश चतुर्थीमुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले. (छायाचित्रे - दत्ता खेडेकर, सुशील कदम, विशाल हळदे) कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिगसारख्या नियमांचे पालन करण्याचे, तसेच गर्दी टाळण्याचे आावाहन करण्यात येत आहे. मात्र या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत.
दरम्यान, उद्या असलेल्या गणेश चतुर्थीमुळे मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध ठिकाणी खरेदीसाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसून आले.
मुंबईतील दादरसह बहुतांश परिसर हा गर्दीने फुलून गेला होता. येथे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी झाली होती. कोरोनाच्या संसर्गाची भीती असूनही लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले होते.
मुंबईलगतच्या ठाण्यामध्येही असेच चित्र दिसून आले. येथेही चतुर्थीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे अनेक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.