ओखी चक्रीवादळाचा तडाखा, आपत्कालीन यंत्रणा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2017 04:45 PM2017-12-05T16:45:47+5:302017-12-06T08:01:17+5:30

ओखी चक्रीवादळामुळे मंगळवारी (5 डिसेंबर) सकाळपासून मुंबई व परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यामुळे मुंबई, ठाणे परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली.

ओखी चक्रीवादळामुळे मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत येत्या 24 तासांत आणखी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक मंदावली होती.

दरम्यान, पावसामुळे अनेकांनी घरीच थांबण्यास पसंती दिली.

ओखी चक्रीवादळामुळे 5 ते 7 डिसेंबर या कालावधीत समुद्रात पाच मीटरपेक्षा उंच लाटांची भरती येण्याची शक्यता आहे.

समुद्रकिनाऱ्याजवळील परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.