Girgaum Padava: The magnificent rangoli that appeared in the Madhav Baag square
गिरगावचा पाडवा : माधवबाग पटांगणात साकारली भव्य रांगोळी By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 05:55 PM2018-03-16T17:55:58+5:302018-03-16T17:55:58+5:30Join usJoin usNext मुंबई : गिरगावमधील भुलेश्वरजवळ असलेल्या माधवबाग पटांगणात भव्य अशी रांगोळी साकारण्यात आली आहे. 'स्वास्थ्यरंग' आणि 'रंगशारदा'च्यावतीने गुढी पाडव्याचे औचित्य साधून 7000 चौरस फुटांची ही रांगोळी पर्यटन महाराष्ट्राचे या संकल्पनेवर आधारीत आहे. 'स्वास्थ्यरंग'चे अध्यक्ष डॉ. तेजस लोखंडे तसेच 'रंगशारदा'चे प्रसाद मुंढे यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 16 कलाकारांनी सलग 9 तास मेहनत घेत ही रांगोळी साकारली आहे. 'स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान'तर्फे आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा अर्थात गिरगावचा पाडवा यावर्षी देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. 18 मार्च म्हणजेच रविवारी सकाळी 8 वाजता गणेश मंदिर इथून स्वागत यात्रेचा प्रारंभ होईल. स्वागत यात्रेचे हे 16 वे वर्ष असून 'पर्यटन महाराष्ट्राचे' या विषयावर यात्रा आधारित आहे. 'अविस्मरणीय अनुभूतींची, भ्रमंती महाराष्ट्राची' अशी यात्रेची संकल्पना आहे. (सर्व फोटो- दत्ता खेडेकर)टॅग्स :गुढी पाडवामुंबईgudhi padwaMumbai