जुहू चौपाटीवरील बोटिंग राईडला चांगला प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 16:01 IST2017-12-28T15:59:26+5:302017-12-28T16:01:26+5:30

जुहू चौपाटीवर जुहू मोरागाव मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाच्या परवानगीने येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी खास 21 डिसेंबर 2017 पासून बोटिंग राईड सेवा सुरू केली आहे.

गळ्यात जॅकेट घालून 16 सीटर फेरीबोटीचा आणि 8 सीटर मोटर बोटीचा सुमारे 15 ते 20 मिनीटे या राईडचा आनंद पर्यटक लुटतात.

अथांग समुद्र,आकाशात दर तीन मिनिटांनी जाणारी विमाने आणि पर्यटकांनी फुललेल्या जुहू चौपाटी,सायंकाळी पालिकेने लावलेल्या एलइडी दिव्यांमुळे कुटुंबासह बोटिंग राईडचा थ्रिलिंग मनमुराद आनंद मिळत आहे.

- दिल्ली,बिहार,मध्यप्रदेश येथील पर्यटकांनीसुद्धा या थ्रिलिंग बोटिंग राईडचा मनमुराद आनंद घेण्यासाठी हजेरी लावली.