कोरोनामुळे मृत पावलेल्यांवर असे होतात अंत्यसंस्कार; स्मशानभूमीतील सुन्न करणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 03:41 PM2020-08-27T15:41:44+5:302020-08-27T18:35:03+5:30

कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी सर्वजण सुरक्षित अंतर पाळून खबरदारी घेत आहेत. पण कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करणारे कसे सुरक्षित अंतर बाळगणार. त्यांना तर थेट मृतदेहालाच स्पर्श करावा लागतो. त्यामुळे त्यांना कसली भीती आणि काय.. (सर्व फोटोः स्वप्निल साखरे)

मागील पाच महिन्यांपासून राज्यातील कोरोना मृतदेहाची संपूर्ण प्रक्रिया करणारे कर्मचारी कोणतीही भीती न बाळगता स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करत आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कार करण्याबाबत सरकारने काही नियमावली तयार केली आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यास तीस मिनिटाच्या आतमध्ये मृतदेह बेडवरुन वेगळ्या खोलीत ठेवला जातो. यानंतर मृतदेह प्लॅस्टिकने बांधला जातो. त्यानंतर पुढील दोन तासात शवविच्छेदन कक्षात मृतदेह हलविला जातो.

ज्या बेडवर रुग्ण होता. तो बेड स्वच्छ करुन घेतला जातो. जेणेकरुन दूसऱ्या रुग्णाला त्रास होणार नाही.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चार- पाच जणांची वेगवेगळी टीम तयार करण्यात आली आहे. रुग्णाचा मृत्यू झालेल्या ठिकाणा जाऊन दोघजण मृतदेह हवाबंद प्लॅस्टिकमध्ये गुंडाळतात. त्यासाठी २५ ते ३० मिनिटांचा वेळ लागतो.

यानंतर मृतदेह नातेवाईकांना दाखवून अंत्यविधीसाठी नेला जातो. यासाठी स्वतंत्र्य रुग्णवाहिका आहे. मृतदेह स्मशानभूमीत घेऊन गेल्यानंतर कर्मचारीच धार्मिक विधी करतात.

बाकीची विधी करु दिली जात नाही. दहन केल्यानंतर बाकीची विधी करण्यास सांगितले जाते. तसेच नातेवाईक आले असतील तर ते लांबूनच दर्शन घेतात.

त्यानंतर मृतदेह स्ट्रेचरवर ठेवला जातो. स्मशानभूमीतील कर्मचारी मृतदेह दाहिनीत टाकतात. एका मृतदेहाच्या अंत्यसंस्काराला एक तास लागतो.

अंत्यसंस्काराची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी मृतदेहाच्या चारही बाजूला सॅनिटाइजरने फवारा करतात.

त्यानंतर कर्मचाऱ्यांनी परिधान केलेले पीपीई किट काढले जातात.

तसेच मास्क, हॅन्डग्लोजची देखील योग्य ठिकाणी विल्हेवाट लावली जाते.

यानंतर स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी आंघोळ करतात.