grand arrival of the Parel Raja in Mumbai
Parel Cha Raja 2019: परळच्या राजाची सामाजिक बांधिलकी, शांततेत आगमन! By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 03:56 PM2019-08-26T15:56:13+5:302019-08-26T16:23:27+5:30Join usJoin usNext रविवारचा दिवस लालबाग-परळसाठी खास ठरला. कारण, परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या 'परळचा राजा'चे आगमन झाले. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये महापुराने थैमान घातले. अनेक कुटुंब या महापुरामुळे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे पूरग्रस्तांना मदत म्हणून यावर्षी परळचा राज्याचं आगमन शांततेत करायचं ठरलं आणि आगमनासाठी वापरण्यात येणारे पैसे पूरग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्यात आले. यंदा कोणताही गाजावाजा नाही, अगदी शांततेत आगमन पार पडलं. यावेळी गणरायाचे विलोभनिय रूप भक्तांच्या मनाचा ठाव घेत होतं. सन १९४७ साली परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने या गणेशोत्सवाची सुरूवात केली. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नरेपार्क, परळचा राजा ही संस्था यावर्षी ६९ वे वर्ष साजरे करीत आहे. टॅग्स :गणेश महोत्सवगणेश मंडळ 2019Ganesh MahotsavGanesh Mandal 2019