A grand ceremony of oath-taking ceremony at Shivaji Park CM uddhav thackeray
शिवाजी पार्कवर जय्यत तयारी, शपथविधीचा ग्रँड सोहळा By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 05:39 PM2019-11-27T17:39:05+5:302019-11-27T17:51:42+5:30Join usJoin usNext महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहे. उद्या दादर येथील शिवाजी पार्क मैदानात म्हणजेच शिवतीर्थावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होत आहे. शपथविधीच्या या ग्रँड सोहळ्यासाठी प्रशासनासोबतच शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादीनेही जय्यत तयारी केल्याचं दिसून येत आहे. उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील 400 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. हे सरकार माझं सरकार असेल अन् सर्वसामान्य कुटुंबाला न्याय देणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले होतं. उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू, अरविंद केजरीवाल, यांनाही निमंत्रण देण्यात येणार आहे. शिवाजी पार्कात तब्बल 70 हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. तर एका मोठ्या व्यासपीठावर प्रमुख पाहुण्यांसाठी खुर्च्या लावण्यात येत आहेत. ठाकरे घराण्यातील पहिलीच व्यक्ती मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने ठाकरे कुटुंब या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील असं सांगितलं आहे. राज ठाकरे सहकुटुंब या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. या शपथविधी सोहळ्याला सांगलीतील शेतकरी दाम्पत्यालाही निमंत्रण देण्यात आलंय, ज्यांनी शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदासाठी पायी विठ्ठलाची वारी केली होती सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. रॅपिड एक्शन फोर्स, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वान पथक आदिसह 4 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनातआहे. शपथविधी सोहळ्याची सकाळपासूनच जय्यत तयारी सुरू असून शिवतीर्थावर ग्रँड सोहळा सायंकाळी पाहायला मिळेल, देशातील दिग्गज नेते या सोहळ्याला हजेरी लावतील. टॅग्स :मुंबईमहाराष्ट्रशिवसेनाराष्ट्रवादी काँग्रेसMumbaiMaharashtraShiv SenaNCP