Hail! Keep precious in life to me guard of honor by police, CM uddhav thackeray
मानवंदना ! आयुष्यातील अनमोल ठेवा By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 02:40 PM2020-01-02T14:40:15+5:302020-01-02T14:44:26+5:30Join usJoin usNext मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पोलिस प्रशिक्षण केंद्र, मरोळ येथे महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन संचलन समारंभ पार पडला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाशी संवाद साधला. कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह कॅबिनेटमंत्री आदित्य ठाकरेही या सोहळ्याला उपस्थित होते. आदित्य यांनी ट्विटरवरुनही याबाबत माहिती दिली आहे. पोलिसांचे संचलन आणि मानवंदना यांचा सन्मान स्वीकारण्याची संधी मिळाली हा आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या वतीने मुंबई पोलिस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मरोळ येथे बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानाच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. या प्रकल्पात प्रशासकीय इमारत, विश्रांतीगृह, वसतीगृह, क्रीडासंकुल आणि सर्व सुविधायुक्त 448 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यात तळमजल्यासह सात मजल्यांच्या 16 इमारतींचा समावेश असणार आहे. महाराष्ट्र पोलिसांना जगातील सर्वोत्तम गोष्टी उपलब्ध करून देऊ, अशा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. पोलीस नेहमीच तणावात असतात, त्यामुळे नववर्षात त्यांना तणावमुक्त करण्याची जबाबदारी शासन घेईल असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पोलिसांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेनामुंबईपोलिसUddhav ThackerayShiv SenaMumbaiPolice