बम बम, बम बम बम्बई, बम्बई पुरी 'तुंबई'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 22:38 IST2019-07-02T22:27:52+5:302019-07-02T22:38:52+5:30

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, गेल्या 4 दिवसांपासून मुंबापुरीतील वाहतूक या पावसामुळे विस्कळीत झाली आहे.
मुंबईकरांची जीवनावाहिनी असलेली लोकलसेवाही पावसाच्या पाण्यामुळे खोळंबली आहे, राजधानीतील लाखो चाकरमान्यांना याचा फटका बसला आहे
आधीच ट्रॅफीक समस्या, त्यात पावसाने संपूर्ण वाहतूक व्यवस्थाच कोलमडली आहे. दुचाकी, चाकचाकी आणि पब्लीक ट्रान्सपोर्टही पावासामुळे बिघडलंय
पडत्या पावसात, खोळंबलेल्या रेल्वे प्रवासातही मुंबईकरांचं स्पिरीट दिसून येतंय. काही केलं तरी मुंबईच्या रस्त्यावर, रुळांवर माणसांची गर्दी दिसतेच.
पावसांमुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत, तर कार्यालय अन् शाळांमध्येही पाणी शिरले आहे. प्रशासनही निसर्गचक्रापुढे हतबल झाले आहे.
कुठे आसू तर कुठं हसू आणणारा हा मुंबईचा पाऊस आहे. पावसामुळे एका दिवसात 22 जणांना जीव गमावावा लागला आहे. तर, काही ठिकाणी पावसाचा मनमुराद आनंद लुटला जातोय
कुणी रेल्वे स्थानकावर रात्र काढतंय, तर कुणी आडोश्याला थांबून पावसापासून स्वत:चे संरक्षण करतोय
छोडेंगे न साथ तेरा... पाऊस, ऊन, वादळ वारा काहीही येऊ देत, मी तुझ्याच सोबती
रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यातून गाडी, माणसं अन् जनावरही वाट काढून आपली पुढील वाट धरताना दिसतायेत
छत्री आहे, रेनकोट आहे, सोबतीला पाऊस आहे अन् या पावसात आपल्या कामाच्या ठिकाणी पोहोचायचं स्पिरीटही आहे तोच तर मी मुंबईकर आहे