मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 13:44 IST2018-06-07T13:44:05+5:302018-06-07T13:44:05+5:30

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार गुरुवारी पहाटेपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये पावसाने चांगलचा जोर धरला आहे.

पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अप-डाऊन दिशेच्या गाड्या 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.

सतत पडत असलेल्या पावसामुळे दादर, परळ, माटुंगा, सायन, हिंदमाता या सखल भागांमध्ये पाणी साचले आहे.

रस्त्यांवर पाणी साचल्याने मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली आहे.

रस्त्यावर साचलेल्या पाण्यात बच्चेकंपनी खेळण्याचा आनंद लुटत आहेत.