heavy rainfall hits hindmata, parel,dadar, thane
आधीच कोरोना, त्यात पावसाळा; धो-धो पावसाने मुंबईचं काय केलं बघा! By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 09:03 PM2020-07-04T21:03:41+5:302020-07-04T21:21:03+5:30Join usJoin usNext मुंबई शहर उपनगरासह ठाणे परिसरात शनिवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. विशेषत: मुंबई शहरासह उपनगरात पावसाने अजूनही चांगलाच जोर पकडला आहे. अजूनही मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अद्याप तरी मुंबईत अतिवृष्टी झाली नसली तरी दुपारपर्यंत लागून राहिलेल्या पावसाने मुंबईकरांना काहीसा मनस्ताप झाल्याचे चित्र होते. कुलाबा वेधशाळेने पुढील २४ तासांसाठी वर्तविलेल्या अंदाजानुसार, मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या अधून मधून जोरदार सरी पडत राहतील. काही ठिकाणी अतिजोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाचा वेग कमी असल्याने सखल भाग वगळले तरी फार काही ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत. मात्र रस्ते वाहतूकीसह मुंबापुरीचा वेग मंदावला होता. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचं संकट असताना मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे आणखी हाल झाले आहे. पावसामुळे मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याला देखील उधाण आले होते. समुद्रकिनारी उंच लाटा उसळत होत्या.टॅग्स :पाऊसमुंबईमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRainMumbaiCoronavirus in Maharashtra