The height of the fire brigade could now be extinguished to the 81 meter height
अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 04:36 PM2017-08-23T16:36:24+5:302017-08-23T16:42:19+5:30Join usJoin usNext अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य उत्तुंग इमारतींमध्ये आग लागण्याची घटना वारंवार घडत असल्याने अग्निशमन दलापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे पंचविसाव्या मजल्यापर्यंत पोहोचून आग विझविणारी अत्याधुनिक शिडी अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. (सर्व फोटो - सुशिल कदम)अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य या शिडीची उंची तब्बल ८१ मीटर आहे. याशिवाय अद्ययावत सहा फायर इंजीन, १७ जलद प्रतिसाद वाहनांनी अग्निशमन दल सुसज्ज बनले आहे.अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य अग्निशमन दलात नव्याने दाखल झालेल्या वॉल थ्रॉट नोझलचा वापर करून भिंतीच्या पलीकडील आग भिंतीमध्ये नोझल टाकून विझवता येणार अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य यामुळे इमारतीच्या आत प्रवेश न करता आगीवर नियंत्रण मिळवता येणार आहे.अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य हाय प्रेशर गनच्या माध्यमातून आगीवर पाण्याचा फवारा करता येणार आहे. शिवाय कुठेही नेता येणारी पोर्टेबल रिचार्जेबल लाइट सुटकेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.अग्निशमन दलाची उंची आता ८१ मीटरपर्यंत, पंचविसाव्या मजल्यावरील आग विझवणे शक्य आग आणि धुरामध्ये काम करण्याचे कौशल्य शिकवणारे प्रशिक्षण केंद्रही मुंबई अग्निशमन दलाच्या वडाळा कमांड सेंटरमध्ये सुरू करण्यात आले. या नव्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक या शिडीच्या लोकार्पण कार्यक्रमात करण्यात आलेटॅग्स :मुंबई महानगरपालिकाMumbai Municipal Corporation