Honor by the 'Lokmat' of the personality of Maharashtra
महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा ‘लोकमत’तर्फे सन्मान By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 02:45 PM2019-02-21T14:45:54+5:302019-02-21T15:19:18+5:30Join usJoin usNext लोकमत 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने टाटा मोटर्स (मुंबई) यांचा सन्मान करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात टाटा मोटर्सला पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं. राज्याच्या मंत्रिमंडळातले दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांचा लोकमतकडून सन्मान करण्यात आला. वरिष्ठ राजकारणी या विभागात पाटील यांना गौरवण्यात आलं. देशाच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राजकीय क्षेत्रातली उगवत्या नेतृत्वाला देण्यात येणार 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना सन्मानित करण्यात आले. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात' स्मृती मानधनाचा Sports Person Of The Year पुरस्कारानं गौरव अमेरिकेतील लाखो डॉलरच्या पगाराची नोकरी लाथाडून भारतातील गरजू कॅन्सरग्रस्त मुलांवर उपचार करत त्यांच्यासाठी नवी संजीवनी घेऊन आलेल्या टाटा हॉस्पीटलचे प्रसिद्ध डॉक्टर श्रीपाद बाणावली यांना यंदाचा 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 'न्यूड' या चित्रपटात न्यूड मॉडेलचं काम करणारी अभिनेत्री कल्याणी मुळ्ये हिला यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात डॉ. लोकेंद्र सिंग यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेत्याला भूमिका साकारताना भूमिकेत शिरण्यासाठी हुबेहूब आणि साजेसा चेहरा देणारे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांना 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ इयर' पुरस्काराने बुधवारी सन्मानित करण्यात आले. आर.सी. प्लास्टो टॅन्क्स् अॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विशाल अग्रवाल यांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.टॅग्स :महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019LMOTY 2019