PHOTOS: धारावी स्फोटाची भीषणता! ट्रकसोबत आजूबाजूची वाहनंही बेचिराख, उरली फक्त राख!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 00:30 IST2025-03-25T00:21:09+5:302025-03-25T00:30:24+5:30
मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला.

मुंबईतील धारावीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. धारावीच्या पीएमजीपी परिसरात सिलेंडर वाहून येणाऱ्या ट्रकमध्ये स्फोट झाल्याने मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला.
एकाच वेळी अनेक सिलेंडर फुटल्याने आजूबाजूचा परिसर हा दणाणून गेला आहे, महाराष्ट्र निसर्ग उद्यान परिसरात हा ट्रक उभा होता.
अचानक सुरु लागलेल्या आगीमुळे गोंधळ उडाला. एकामागून एक सिलेंडरचे स्फोट होत होते. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. जवळपास पंधरा मिनिटे सिलेंडर फुटत होते.
त्यामुळे आजूबाजूच्या इमारती आणि झोपडपट्टी मधील रहिवासी यांनी रस्त्यावर धाव घेतली. या घटनेत जिवीतहानी झालेली नाही. धारावीच्या प्रेम नगर परिसरात धारावी बस डेपो समोर कचऱ्याचे डंपर सिलेंडरच्या गाड्या उभ्या केल्या जातात.
अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. या स्फोटामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे संपूर्ण धारावीकर रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे.
सदरची आग फायर ब्रिगेडच्या एकूण 19 गाड्यांनी आटोक्यात आणली आहे.
आग लागलेल्या मोटर वाहन चालकाची ओळख निष्पन्न झाले असून सदर चालकाला ताब्यात घेण्याची काम चालू आहे.
सदर घटनेमध्ये कोणीही जखमी नसून आग लागलेल्या ट्रकच्या शेजारी पार्क केलेल्या साधारण तीन ते चार मोटार वाहनांचे आगीमुळे नुकसान झाले आहे.