'खाकी'तील माणुसकी! महिला पोलीस रेहाना शेख बनलीय गरजूंसाठी मसीहा; कौतुकास्पद कार्याला तुम्हीही कराल सलाम By पूनम अपराज | Published: July 4, 2021 07:37 PM 2021-07-04T19:37:06+5:30 2021-07-04T19:46:00+5:30
मुंबई पोलीस दलाची मान नक्कीच या महिला पोलीस नाईकच्या कर्तृत्वाने उंचवेल. असे बरेच पोलीस आहेत, जे आपल्या कर्तव्याच्या अलीकडे जातात आणि सामाजिक भान राखून लोकांना मदत करतात. माणुसकीचे एक अद्भुत उदाहरण मुंबई पोलीस दलातील एक महिला पोलीस आहे. ४० वर्षीय रेहाना शेख यांनी ५० गरीब मुलांच्या शिक्षणाचा भार आपल्या खांद्यावर घेण्याबरोबरच ५४ लोकांना प्लाझ्मा, ऑक्सिजन, रक्त आणि रुग्णालयात मदत पुरविली आहे. अशाच सामाजिक भान जपणाऱ्या कर्तव्यदक्ष महिला पोलिसाच्या अनोख्या कामगिरीचा आढावा घेऊया.
मुंबई पोलीस दलातील पोलीस नाईक रेहाना शेख यांनी रायगडमधल्या धामणी गावातील ज्ञानाई विद्यालयातील ५० मुलांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेतलंय. धामणी गावातील ज्ञानाई विद्यालयातील या मुलांना त्यांनी पुस्तकं, कपडे, चपला आणि शालेय साहित्यासाठी हातभार लावलाय. तसेच कोरोनाच्या संकटात सॅनिटायझर-मास्कचं वाटप केलंय.
इयत्ता ४ थी पासून ते १० पर्यंत या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्च रेहाना यांनी उचलला आहे. रेहाना यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, माझे सहकारी रायगडमधील या शाळेच्या कार्यक्रमाचे फोटो पाहत असताना त्यांना मी या शाळेबद्दल विचारलं. नंतर १७ मेमध्ये माझी मुलगी नमरा हीच वाढदिवस होता. ती बारावीला आहे. त्यावेळी या शाळेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा करायचा ठरवलं. पण कोरोनाचे सावट असल्याने जाता आले नाही.
ईद पण होती. दरम्यान ईद साजरी करण्याचे पैसे आणि मुलीच्या वाढदिवस साजरा करण्याचे पैसे जमा केले आणि नंतर या शाळेतील मुलांना दिले. जे या मुलांचे फोटो पहिले तेव्हा या मुलांच्या पायात चप्पला नव्हत्या, आदिवासी पाड्यातील मुलं असल्याचे मूलभूत सुविधांपासून ते दूरच होते. माझ्या वडिलांसाठी सुद्धा मला या मुलांना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले. मी मूळची कराडची आहे. पण माझी नाळ आता या मुलांमुळे कोकणाशी जोडली गेली आहे.
पुढे रेहाना म्हणाल्या, मी, माझे पती आता मुंबई पोलीस दलात कार्यरत आहोत. माझे वडील आणि सासरे पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहे. पोलिसांचा वारसा लाभलाय. आता सातवे वेतन आयोग लागू असल्याने आम्हाला खूप पगार आहे. मग त्यातील किंचित पगार या मुलांच्या शिक्षणासाठी दिला, तर काय झालं.
कोव्हिडमधून बरे झाल्यानंतर रेहाना शेख यांनी आतापर्यंत ५४ जणांना प्लाझ्मा दिल्याने त्यांचं अगदी मुंबईत पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनीही कौतुक केलंय.
रेहानाने मानवतेचे एक उदाहरण उभे केले, आयुक्तांनी केला सन्मान - माणुसकीचे आणि कर्तृत्वाचे उदाहरण देणारी रेहाना शेख यांचा मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पोलिसांच्या कर्तव्यासह सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी आयुक्तांनी रेहाना यांना आपल्या कार्यालयात बोलावून प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.
ईद आणि मुलीच्या वाढदिवसाच्या खर्चाची बचत मुलांवर खर्च - रेहाना यांनी रायगडच्या मुलांसाठी शिक्षणाचा खर्च दहावीपर्यंत घेण्याचे आश्वासन दिले. त्या म्हणाले, 'गेल्या वर्षी मला रायगडमधील शाळेबद्दल माहिती मिळाली. प्राचार्यांशी बोलल्यानंतर तेथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की, बहुतेक मुले खूप गरीब कुटुंबातील आहेत, त्यांच्या पायात चप्पलही नव्हती. माझ्या मुलीच्या वाढदिवशी आणि ईदच्या खरेदीतून मी काही बचत केली होती, जे मी मुलांसाठी खर्च केले.
प्लाझ्मा, रक्त, बेड ... रुग्णांना मदत करत राहिले - २००० साली कॉन्स्टेबल म्हणून पोलिस दलात रुजू झालेल्या रेहाना यांनी सांगितले की, गेल्या वर्षी त्यांनी एका हवालदाराच्या आईसाठी इंजेक्शनसाठी प्रयत्न केला होता. त्यानंतर मला प्रोत्साहन मिळाले आणि अधिकाधिक लोकांना मदत केली. पोलिस विभागातूनच अनेकांनी रुग्णालयांमध्ये रक्त, प्लाझ्मा आणि बेडसाठी विनंती केली. आम्ही व्हॉट्सअॅपवरून इतर ग्रुपच्या मदतीने प्रयत्न केला.
रेहाना शेख देखील ऍथलिट आहे, नवरा म्हणतो 'मदर टेरेसा' - रेहाना यांचे वडील अब्दुल नबी बागवान हे मुंबई पोलिसातून उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. नवरासुद्धा पोलिसात आहे आणि पती रेहान यांना 'मदर टेरेसा' म्हणतो. तर महत्वाचे म्हणजे रेहाना शेख ऍथलिट आणि व्हॉलीबॉलपटू राहिली आहे. २०१७ मध्ये श्रीलंकेत आपल्या शक्तीचे प्रतिनिधित्व करत त्याने दोन सुवर्ण व एक रौप्यपदक जिंकले आहे.