इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्रायल'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 14:24 IST2018-01-19T14:19:09+5:302018-01-19T14:24:28+5:30

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (19 जानेवारी) मुंबई दौऱ्यातील शेवटच्या टप्प्यात 'शलोम' या बॉलिवूडच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
नेतान्याहू यांनी बॉलिवूडकरांसोबत सेल्फीही काढला.
'ट्विटरवर अमिताभ यांचे 3 कोटींहून अधिक फॉलोअर्स. मी निशब्द झालोय'', असे सांगत त्यांनी बिग बींचं कौतुक केले.
नेतान्याहू यांनी आपल्या भाषणाची सुरुवात 'प्यारे दोस्तो, नमस्कार' अशी केली तर शेवट 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय इस्त्रायल', असे म्हणत केली.
संपूर्ण जग बॉलिवूडचं चाहतं आहे. इस्त्रायलही बॉलिवूडचा चाहता आहे आणि मीदेखील तुमचा चाहता आहे - बेंजामिन नेतान्याहू