इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहूंचा मुंबई दौरा, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 15:07 IST2018-01-18T14:58:37+5:302018-01-18T15:07:53+5:30

इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू गुरुवारी (18 जानेवारी) मुंबईच्या दौ-यावर आहेत.
बेंजामिन नेतान्याहू यांच्या मुंबई दौ-याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
नेतन्याहू यांच्या आगमनापूर्वी इस्त्रायली पोलिसांकडून नरीमन हाऊस परिसरातील दुकानांची कसून तपासणी करण्यात आली.
नरीमन हाऊस परिसरातील सर्व दुकानांची झाडाझडती घेण्यात आली.
मुंबई पोलीस आणि इस्त्रायली पोलिसांकडून कसून तपासणी करण्यात आली.