कमला मिल अग्नितांडव: चार तासात होत्याचं नव्हतं झालं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 13:46 IST2017-12-29T13:40:10+5:302017-12-29T13:46:55+5:30

कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीमध्ये गुरुवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ‘वन अबव्ह’ या पबमध्ये आग लागली.

इमारतीच्या टेरेसवर बांबू आणि प्लास्टिकचे छप्पर असल्याने आग झपाट्याने पसरत गेली.

या आगीत कमला मिल कम्पाऊंडमधील 'वन-अबव्ह' पब आणि 'हॉटेल मोजोस ब्रिस्टो' जळून खाक झालं आहे.