Khamang - The street food of delhi, you must taste this foood
खमंग - दिल्लीत या स्ट्रीट फूडची चव घ्यायलाच हवी By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 06:32 PM2018-08-08T18:32:30+5:302018-08-08T18:58:20+5:30Join usJoin usNext दिल्लीच्या राजौरी गार्डन येथील आलू चाट आणि टिक्की चाट मसाल्याची चव चाखायलाच हवी. खाण्याचे शौकीन असलेल्यांनी येथील अतुल चाट सेंटरवर फेरफटका मारायलाच हवा. लाजपत नगरचे सेंट्रल मार्केट शॉपिंगसोबतच, चायनिज स्टॉलसाठीही प्रसिद्ध आहे. येथील चायनिज चाट खाल, तर वारंवार येथे जाल. पावसाळ्यात पकोड म्हणजेच शुद्ध मराठी भजे खाण्याची मजा काही औरच. पण, दिल्लीच्या सरोजनी नगरमधील खानदानी पकोडे खायलाच हवे. आलू पकोडे, कांदा पकोडे आणि मिर्ची पकोडे... दिल्ली आणि चांदणी चौक यांचं नातं वेगळच आहे. चांदणी चौक जसा खरेदीसाठी प्रसिद्ध आहे, तसचं येथील चाटही जबरदस्त. येथील लाला बाबू चाटवर पाणीपुरी, दहीपुरी खायलाच हवी. छोले भटुरे हा उत्तरेकडील फेमस पदार्थ. दिल्ली आणि उत्तर भारतातील नागरिकांचा सकाळचा नाश्ता म्हणजे छोले भटुरे. येथील चांदणी चौकात लोटन के छोले-कुल्चे एकदा तरी टेस्ट कराच. पहाडगंज येथे जाण्याची संधी मिळाल्यास तेथील सितारामचे छोले-भुटरे खायची संधी दवडू नका. दिल्लीच्या करोलबाग येथे जाल तर कुल्फी जरुर खाल. जेवण झाल्यानंतर फिरायला करोल बाग परिसरात जावा अन् आईसक्रीम खायची मजा घ्या.टॅग्स :दिल्लीचांदनीअन्नdelhiChandnifood