Kisan Long March: 1 lakh people from Panvel for farmers
Kisan Long March : शेतक-यांसाठी पनवेलहून १ लाख भाक-या By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 04:20 PM2018-03-12T16:20:43+5:302018-03-12T16:20:43+5:30Join usJoin usNext नाशिकहून पायपीट करत मुंबईत पोहोचलेल्या हजारो शेतक-यांसाठी पनवेलकरांनी एक लाख भाक-या आणि 500 किलोचं सुकट पाठवलं होतं. पनवेलमधील गावांगावांतून भाक-यागोळा करून मुंबईला पाठवण्यात आल्या आहेत. 5 दिवस पायपीट करत 166 किमीहून अधिक अंतर कापत मुंबईत दाखल झालेल्या या शेतकरी मोर्चेक-यांच्या जेवणाचा प्रश्न सोडवण्यासाठी पनवेलकर पुढे सरसावले. शेतकरी कामगार पक्षानं (शेकाप) शेतक-यांच्या या भोजनाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी स्थानिक सरपंचांना सांगून भाक-या बनवून घेतल्या आहेत. प्रत्येक सरपंचाला भाक-यांचं टार्गेट देण्यात आलं होतं. त्यानुसार 1 लाख भाक-या बनवण्यात आल्या आहेत.टॅग्स :किसान सभा लाँग मार्चमहाराष्ट्रKisan Sabha Long MarchMaharashtra