Lalbaugcha Raja 2024 First Look २० किलो सोन्याचा मुकूट, काशी विश्वनाथ मंदिराची थीम; पाहा, लालबागच्या राजाची पहिली झलक By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 11:19 PM 2024-09-05T23:19:38+5:30 2024-09-05T23:27:27+5:30
Lalbaugcha Raja 2024 First Look: कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आणि दरवर्षीप्रमाणे उत्सुकता असलेल्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली. पाहा, मनमोहक स्वरुप असलेल्या राजाचे काही अप्रतिम फोटो... Lalbaugcha Raja 2024 First Look: अगदी काही तासांवर गणरायाचे आगमन आले आहे. मुंबईत घरोघरी तसेच मंडळांमध्ये गणपती बाप्पाची स्थापना करून परंपरेप्रमाणे पुजले जाते.
मुंबईत मंडळांच्या गणपतींचे मोठे आकर्षण असते. अनेक मंडळे गेली अनेक दशके गणपती बसवतात. यापैकी काही मंडळे जगभरात पोहोचली आहेत. यातील एक म्हणजे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजा.
गणेश चतुर्थी आणि पुढील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लालबागचा राजा मंडळाचे लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवली. हजारो भाविक या सोहळ्याला उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे लालबागच्या राजाची पहिली झलक पाहण्यासाठी भाविक आतुर झाले होते. यंदा कोणती थीम असणार आहे. लालबागचा राजा कसा असेल, याबाबत प्रचंड उत्सुकता होती.
लालबागच्या राजाची पहिली झलक समोर येताच सर्वांनी जयजयकार केला. लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वाधिक भेट दिले जाणारे गणेश मंडळ आहे. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत लाखो मुंबईकर लालबागच्या लांबच लांब रांगेत दरवर्षी या प्रतिष्ठित मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी उभे असतात.
यावर्षी पारंपारिक पद्धतीने लालबागच्या राजाची पहिली झलक दाखवण्यात आली. डोळे दिपवणारे असे लालबागच्या राजाचे रूप पाहायला मिळाले. मनमोहक रुप आणि मरून रंगाच्या वेल्वेटच्या पितांबरमध्ये राजाचे भव्य स्वरुप सर्वांना पाहायला मिळाले.
यावर्षी लालबागच्या राजाला काशी विश्वनाथ मंदिराची थीम ठेवण्यात आली आहे, असे सांगितले जात आहे. यंदाच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आल्यानंतर राजाचे भव्य स्वरुप अनेकांनी मोबाइलमध्ये, कॅमेरामध्ये कैद करून घेतले.
लालबागच्या राजाची पहिली झलक मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे यंदा लालबागच्या राजाला सोन्याचा मुकूट घालण्यात आला आहे. यंदाचे लालबागच्या राजाचे ९१ वे वर्ष असल्याचे सांगितले जात आहे.
हा सोन्याचा मुकूट दुसऱ्या तिसऱ्या कोणी दिला नसून अनंत अंबानी, रिलायन्स फाऊंडेशनने दिला आहे. या मुकूटाची खासीयत म्हणजे त्याचे वजन २० किलो एवढे असणार आहे. तर याची किंमत १५ कोटी रुपये आहे.
हा मुकूट बनविण्यासाठी कारागिरांना दोन महिने लागले आहेत. लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी आज प्रथम दर्शन सोहळा सुरु होण्यापूर्वी याची माहिती दिली आहे.
अनंत अंबानी गेल्या १५ वर्षांपासून लालबागच्या राजाच्या मंडळाशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. अनंत अंबानी गणेशोत्सव काळात लालबागच्या राजाच्या विविध कार्यक्रमांना आवर्जुन उपस्थितीत असतात.
लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकारणीमध्ये उद्योजक अनंत अंबानी यांची कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.