Lata Mangeshkar : लतादीदींचे 1.5 कोटी फॉलोअर्स, पण केवळ 9 व्यक्तींना करायच्या फॉलो By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:04 PM 2022-02-06T14:04:43+5:30 2022-02-06T14:35:15+5:30
लता दिदी आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी म्हणजेच जवळपास दीड कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. गानकोकिळा लता मंगेशकर यांचं आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला. नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला येणार असल्याचेही समजते.
लता मंगेशकर आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन केवळ 9 जणांना फोलो करत, त्यामध्ये त्यांचे लहान बंधु ह्रदयनाथ मंगेशकर हे एक असून घरातील एकूण 4 सदस्य आहेत.
मास्टरब्लास्टर यांचं आणि त्यांच आई-मुलासारखं नातं होतं, शिवाय त्या क्रिकेटच्या चाहत्या. म्हणूनच सचिन तेंडुलकर यांनाही त्या ट्विटरवर फॉलो करत होत्या.
लता मंगेशकर त्यांची नातं म्हणजेच आशा भोसलेंची नात असलेल्या झनाई भोसलेंना लतादिदी ट्विटरवर फॉलो करत होत्या.
लता मंगेशकर यांच्या लहान बहिणी आणि प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनाही त्या फॉलो करत होत्या.
उषा मंगेशकर याही त्यांच्या बहिण आहेत, याही संगीत क्षेत्रात मोठं योगदान देत आहेत. लता दिदी त्यांनीही ट्विटरवर फॉलो करत.
अमिताभ बच्चन यांनाही त्या ट्विटरवर फॉलो करत होत्या. देशातील दिग्गज व्यक्तींपैकी केवळ 5 ते 8 व्यक्तींना त्या ट्विटरवर फॉलो करत होत्या, तर देशाबाहेरी केवळ दलाई लामा यांना त्या फॉलो करत होत्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचंही जिव्हाळ्याचं नातं होतं. लता दिदी मोदींना लहान भाऊ मानत. तर, मोदीही त्यांना मोठ्या बहिण मानत.
जगभरात शांततेचं प्रतिक मानले जाणाऱ्या दलाई लामा यांनाही लता मंगेशकर ट्विटरवर फॉलो करत होत्या. एकमेव विदेशी व्यक्ती असलेल्या दलाई लामांना त्या फॉलो करत.
लता दिदीं आपल्या ट्विटवर अकाऊंटवरुन चाहत्यांशी आणि दिग्गजांशी कनेक्ट होत्या. त्यामुळेच ट्विटरवर त्यांना 1.49 कोटी फॉलोअर्स आहेत, पण त्या केवळ 9 व्यक्तींना फॉलो करायच्या. त्यामध्ये, मुंबईच्या बांद्रा वेस्ट येथील अॅपल स्टोरच्या ट्विटर अकाऊंटलाही त्या फॉलो करत