LFW 2018: लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसला करीनाचा जलवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 14:20 IST2018-02-05T14:10:59+5:302018-02-05T14:20:24+5:30

मुंबईत रविवारी लॅक्मे फॅशन वीकचा ग्रॅण्ड फिनाले पार पडला. यावेळी करीना कपूरचा ग्लॅमरस अवतार पहायला मिळाला.

करीना कपूर नेहमी आपल्या फॅशनसाठी चर्चेत असते. यावेळीही तिच्या फॅशनची जोरदार चर्चा होती.

लॅक्मे फॅशन वीक 2018च्या शेवटच्या दिवशी करीना कपूर जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा सर्वांचं लक्ष तिने वेधून घेतलं.

करीनाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये ती प्रचंड सुंदर दिसत होती.

करीनाने ग्रॅण्ड फिनालेमध्ये फॅशन डिझायनर अनामिका खन्नासाठी रॅम्पवॉक केला.

करीनाच्या स्टायलिश ज्वेलरीनेही सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं

अनामिका खन्ना यांनी करीनाचा काळा ड्रेस डिझाइन केला होता, ज्यामध्ये तिचं सौदर्य खुलून दिसत होतं.