Lot of devotees gather to bid farewell to the king of Lalbaug
Lalbaugcha Raja 2019: लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी लोटला भक्तांचा जनसागर By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 10:55 PM2019-09-12T22:55:23+5:302019-09-12T23:01:59+5:30Join usJoin usNext अनंत चतुर्दशीनिमित्त लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी भक्तांचा जनसागर राज्यभरातील समुद्र किनारी लोटला आहे.( सर्व छायाचित्र- सुशील कदम, स्वप्नील साखरे) गणेश चतुर्थीपासून ते आज अनंत चतुर्दशीपर्यंत भक्तांना दर्शन दिल्यानंतर लालबागचा राजा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे. लालबागचा राजा श्रॉफ इमारतीजवळ पोहोचल्यानंतर त्याच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी भक्तांची लोटलेली मांदियाळी मनमोहक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली. मुंबईत गणपती विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गेले अकरा दिवस भक्तिभावे पूजा करताना गणेशभक्तांमध्ये उत्साह असला तरी साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप दिला. विविध समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ भक्तांनी गणपती विसर्जनासाठी गर्दी केलेली आहे. टॅग्स :गणेशोत्सवलालबागचा राजागणेश विसर्जनGanpati FestivalLalbaugcha RajaGanesh MahotsavGanesh Visarjan