मुंबईतल्या सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या मजल्याला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 20:46 IST2018-06-01T20:46:46+5:302018-06-01T20:46:46+5:30

फोर्ट येथील बलार्ड इस्टेटमधील सिंधिया हाऊस या सहा मजली इमारतीच्या तिस-या आणि चौथ्या मजल्यावर शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास आग लागली. (सर्व छाया- सुशील कदम)
आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले.
आठ फायर इंजिन आणि सहा जेटीच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होते.
दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये चार ते पाच जण वरच्या मजल्यासह गच्चीवर अडकल्याची माहिती प्राप्त होताच अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना सुखरुप बाहेर काढले.
दुस-या मजल्यावर अडकलेल्या आणखी एका व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.