Makar Sankranti 2018: why we kites flying on Makar Sankranti
Makar Sankranti 2018 : या ५ कारणांमुळे मकरसंक्रांतीला उडवतात पतंग By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 05:48 PM2018-01-12T17:48:08+5:302018-01-12T17:51:52+5:30Join usJoin usNext भारतात मकरसंक्रांतीला पतंग उडवण्याची पध्दत फार पुर्वीपासून चालत आली आहे. मात्र यादिवशी पतंग उडवण्यामागे काही कारणं कारण असु शकतात हा विचार तुम्ही कधी केलात का? तर ही काही कारणं आहेत की ज्यामुळे मकरसंक्रांतील पतंग उडवले जातात १)तर कसं आहे की आपल्याकडे जास्त करून सकाळच्यावेळी पतंग उडवली जातात. त्यावेळी सूर्य तेजस्वी असतो मात्र तापलेला रखरखीत नसतो. मानवी शरीराला झेपेल इतकी उष्णता त्या सूर्यकिरणांत असते. त्यादरम्यान आपलं शरीर बराच वेळ सूर्यासमोर असतं. ही सकाळची सूर्यकिरणं मानवी शरीराला, त्वचेला आणि डोळ्यांना फार लाभदायक असतात. २)तसंही हिवाळ्यात शरीर कोरडं आणि रखरखीत पडलेलं असतं. सूर्याची ही किरणं अंगावर घेतल्याने शरीरावरील जीवजंतु मरतात आणि शरीरातील उदासिनता निघून जाते असं म्हटलं जातं. ३)तसंच कोणत्याही प्रकारची अॅलर्जी किंवा इन्फेक्शन झालं असेल तर तेही निघून जातं. तसंही परदेशात ‘सनबाथ’ ही फार महत्त्वाची आणि आरोग्यदायी गोष्ट मानली गेली आहे. तसंच या दरम्यान आपण पतंग उडवत असतो म्हणजेच मजा-मस्तीच्या मुडमध्ये असतो, त्यामुळे उन्हात उभं राहील्याचा कंटाळा येत नाही. ४)या दरम्यान आपण शरिरासाठी किती महत्त्वाचं काम करत असतो याची आपल्याला कल्पनादेखील नसते. काय म्हणता? कौतुक वाटतं ना आपल्या पुर्वजांचं ज्यांनी आपल्यासाठी इतक्या आरोग्यदायी प्रथा रुजु करून ठेवल्या. ५)पण ही एक गोष्ट विसरायला नको की पतंग उडवण्याचं हे काम उन्हं डोक्यावर येण्याआधी केलेलं चांगलं. कारण दुपारनंतरचं रणरणतं उन आपल्या शरिराला घातक ठरु शकतं. दरम्यान चक्कर येण्याचीही शक्यता असते. टॅग्स :मकर संक्रांती २०१८भारतीय सणभारतीय परंपरामुंबईMakar Sankranti 2018Indian FestivalsIndian TraditionsMumbai