Mandeshi Festivle organised in Mumbai from today, Experience the culture of the village
'माणदेशी महोत्सवा'ने आणली मुंबईकरांसाठी पर्वणी! शहराच्या वर्दळीत अनुभवा गावाकडची संस्कृती By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:37 PM2020-01-09T18:37:09+5:302020-01-09T18:42:07+5:30Join usJoin usNext गावाकडचे किल्ले, गावाची चावडी, घराचा ओटा, घरासमोरील पडवी, गुरे-ढोरे या सर्वाचा अनुभव सेल्फी पॉंईटमधून मुंबईकरांना घेता येणार आहे. यंदा सुरुवात होतेय ती माणदेशी महोत्सवाच्या प्रवेश द्वारापासून, गावाकडील संस्कॄती, आणि विविध स्कल्प्चर्सचा देखावा पाहता येणार आहे माण. सातारा जिल्ह्यातील एक दुष्काळी भाग. या भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने आणि महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी माणदेशी फाऊंडेशनची स्थापना झाली. दरवर्षी माणदेशी फाऊंडेशन संस्थेचा “माणदेशी महोत्सव” मुंबईमध्ये भरविला जातो. माणदेशी महोत्सवाचे मुंबईतील यंदाचे चौथे वर्ष आहे. या महोत्सावाचा अनुभव यंदा ९ जानेवारी ते १२ जानेवारी २०२० कालावधीत रविंद्र नाट्यमंदिराच्या प्रांगणात घेता येणार आहे. या महोत्सावाचं उद्धाटन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी यंत्रसामुग्री प्रदर्शन तसेच मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक मृदुला दाढे-जोशी आणि माण तालुक्यातील आर.जे केराबाई यांचे संगीत ऐकायला मिळणार आहे