बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2017 13:49 IST2017-11-27T13:44:46+5:302017-11-27T13:49:07+5:30

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनं सोमवारी (27 नोव्हेंबर) मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी तिचे आई-वडीलदेखील सोबत होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मानुषी जवळपास अर्धा तास मंदिरात होती व तिनं बाप्पाची आरतीदेखील केली.
मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर मानुषी छिल्लर शनिवारी रात्री मुंबईमध्ये दाखल झाली. यावेळी विमानतळावर तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.
मानुषी छिल्लर ही भारतातील सहावी महिला आहे, जिनं मिस वर्ल्ड हा किताब जिंकला आहे.