Meghalaya center for excellence of india and western Music Event in Mumbai
मुंबईने अनुभवला मेघालयातील आदिवासी प्रतिभेचा अविष्कार By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 04:50 PM2018-03-08T16:50:34+5:302018-03-08T16:50:34+5:30Join usJoin usNext नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या कार्यक्रमात मेघालयातल्या विद्यार्थ्यांनी भारतीय क्लासिकल ते सुफी व अल्टरनेटिव्ह रॉक अशा विविध संगीत प्रकारांचा मिलाफ करून सादर केलेला कार्यक्रम अविस्मरणीय ठरला. सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंडिया अँड वेस्टर्न म्युझिक या भारतातील एका प्रमुख म्युझिक इन्स्टिट्यूटमधील विविध वंशांचे आदिवासी विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. मेघालयामध्ये संगीत हा केवळ छंद नसून, जीवनाचा व संगोपनाचा अविभाज्य भाग आहे. तरुण संगीतप्रेमींना पाठबळ देण्याच्या हेतूने सेंटर ऑफ एक्सलन्स इन इंडिया अँड वेस्टर्न म्युझिकची स्थापना करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला लोकप्रिय गायक शान यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ही संस्था मेघालयातल्या डोंगरकपारीत राहणाऱ्या अतिशय प्रतिभावान संगीतप्रेमींना जागतिक दर्जाचे आधुनिक प्रशिक्षण देते.