मुंबईत काढण्यात आली मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरची जंगी मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 21:20 IST2017-12-02T21:17:42+5:302017-12-02T21:20:05+5:30

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचं देशभरात कौतुक होतंय. शनिवारी मुंबईत तर तिचं खास स्वागत करण्यात आलं.

शनिवारी मुंबईत, 'निलांबरी' या ओपन बसमधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.

ओपन बसमधून मुंबईकरांच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतर मानुषी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना भेटली. यावेळी तिनं बच्चेकंपनीशी मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरंही दिली.

यावेळी एका विद्यार्थ्याने मानुषीला तुमचं आदर्श कोण आहे असा प्रश्न विचारला. त्यावेळी मानुषीने माझी आई असल्याचं उत्तर दिलं. तसेच विद्यार्थ्यांनी मानुषीचं गाणं गाऊन आणि डान्स करून स्वागत केलं. मिस वर्ल्ड मानुषीसोबत फोटो काढण्यासाठीही सर्वांनी यावेळी गर्दी केली होती.