MLA one, many costumes, in hemant karkare
आमदार एक, वेशभूषा अनेक By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 07:45 PM2019-06-26T19:45:28+5:302019-06-26T19:57:04+5:30Join usJoin usNext राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये नेहमी आपल्या लूकमुळे अधिवेशन काळात चर्चेत येतात. आमदार एक वेशभूषा अनेक अशीच त्यांची महती बनली आहे. मागील अधिवेशनात शिवाजी महाराजांच्या पोशाखात येऊन बेमूर्वतखोर सत्ताधाऱ्यांना चालते व्हा असा आदेश देत प्रश्नांकडे लक्ष वेधून घेण्याचे अभिनव आंदोलन केले होते. तसेच दुसरीकडे संभाजी भिडे यांनी आंबा खाल्ल्याने मुलं होतात या विधानाचा निषेध करण्यासाठी संभाजी भिडे यांच्या वेशात विधानभवनात प्रवेश करुन आंब्याची पेटी हातात घेतली होती. संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांनी चक्क संभाजी भिडेंच्या वेशात विधानभवनात इतर आमदारांना चक्क आंबेही वाटले होते. संत तुकाराम महाराजांच्या अपमान झाल्याचा निषेध नोंदवताना प्रकाश गजभिये यांनी संत तुकाराम यांचा वेश धारण केला होता. मुंबईवर झालेल्या २६/११ हल्यातील शहीद पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात अनेक स्तरातून टीका झाली होती. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने अडकवले, त्यांना मी सांगितले होते की, तुमचा सर्वनाश होईल, त्यांचा स्वत:च्या कर्मानेच मृत्यू झाला, असे धक्कादायक विधान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी केले होते. यावेळी प्रकाश गजभिये यांनी मी प्रज्ञाच्या शापाने मेलो नाही ही अंधश्रद्धा आहे. मी देशासाठी शहीद झालो आहे अशा आशयाचे पोस्टर घेऊन प्रज्ञा ठाकूरच्या वक्तव्याचा निषेध केला. गजभिये यांनी तेथील सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा प्रमुखांनी अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, नेहमीप्रमाणे ते नव्या वेशात विधानभवनात पोहोचलेच. प्रकाश गजभिये यांच्या शहीद हेमंत करकरे लूकची मोठी चर्चा विधानभवन परिसरात झाली. गजभिये यांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला. टॅग्स :प्रकाश गजभियेराष्ट्रवादी काँग्रेसआमदारविधानसभाPrakash GajbhiyeNCPMLAvidhan sabha