mukesh ambani wife nita offer son akash wedding card at siddhivinayak
उद्योगपती मुकेश अंबानी सहकुटुंब सिद्धिविनायकाच्या चरणी By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 01:35 PM2019-02-12T13:35:01+5:302019-02-12T14:10:22+5:30Join usJoin usNext उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. या दोघांनी मुलगा आकाशच्या लग्नाची पत्रिका गणपतीच्या चरणी अर्पण केली आहे. आकाश अंबानी याच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून रंगली आहे. श्लोका मेहतासोबत आकाश येत्या 9 मार्च रोजी विवाह बंधनात अडकणार आहे. मुंबईच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये तीन दिवस हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. तसेच 11 मार्चला मोठे रिसेप्शन होणार असल्याची माहिती मिळत आहे. आकाशच्या लग्नाची पत्रिका मुकेश आणि नीता अंबानी यांनी सिद्धिविनायकाच्या चरणी ठेवली आणि कार्य निर्विघ्न पार पडावे अशी प्रार्थना केली. यावेळी सिद्धिविनायक मंदिराचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध अभिनेते आदेश बांदेकर उपस्थित होते. धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर श्लोकाने प्रिंस्टन युनिव्हर्सिटीमधून अँथ्रोपॉलिजीचं शिक्षण घेतलं. पुढे तिने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिमधून मास्टर्स केलं आहे. 2014 पासून श्लोका रोसी ब्लू फाउंडेशनमध्ये डिरेक्टर पदावर काम करते. त्यासोबतच ती कनेक्टफॉर नावाच्या एका संस्थेत को-फाऊंडरही आहे. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीचा श्लोका मेहतासोबत 30 जूनला साखरपुडा झाला. हा सोहळा अँटिलियावर मोठ्या झोकात पार पडला. बॉलिवूड आणि उद्योग जगतातील दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती. टॅग्स :मुकेश अंबानीलग्नMukesh Ambanimarriage